लोकदर्शन*सोलापूर 👉मोहन भारती
दिनांक :- ०१/११/२०२२ :-* येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत जुने प्रभाग १९ मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगवा फडकविणारच् असा निर्धार प्रभाग १९ मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्याचे शिवसेना शहर प्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी माहिती दिली आहे.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकी संदर्भी प्रभाग निहाय बुथ यंत्रणा व नुतन पदाधिऱ्यांचे निवड संपर्क प्रमुख श्री अनिल कोकीळ साहेब यांचे आदेशानुसार व प्रक्रिया कामकाज सुरु आहे. त्या अंतर्गत प्रभाग पदाधिकऱ्यांची व शिवसैनिकांची बैठक दि. ३०/१०/२०२२ रविवार रोजी सकाळी ९ वाजता शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली व उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक भिमाशंकर म्हेत्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर बोडा यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) व उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभाग निहाय कामकाजात प्रारंभी सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख देण्यात आली. त्यानंतर प्रभागाची संपुर्ण माहिती व राजकीय परिस्थिती उपशहरप्रमुख सचिन गंधुरे यांनी प्रभागात शिवसेनेचे मतदार सर्वाधिक असुन त्यांच्यापर्यत पोहचणे गरजेचे आहे. असे म्हणाले. आणि उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रभागात नागरी सुविधांचा मोठी समस्या असून त्याबाबत आवाज उढविण्याचे गरज आहे. त्यासाठी एखादा मोर्चा व आंदोलन पक्षाच्या वतीने करावे. अशी सुचना मांडुन येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भगवा फडकविल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार केला.
सदर बैठकीत शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) व उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, जिथे पदाधिकारी सक्षम व बुथ यंत्रणा सक्षम तिथे पक्ष व संघटना मजबुत असते म्हणुन चला कामाला लागा आपला भगवा फडकविण्याचा निर्धार पुर्ण करा. असा आव्हान केले. सदर बैठकीत इम्रान पठाण, विष्णू शिंदे, सचिन माने, जयराम सुंचू, देविदास कोळी, सिध्देश्वर नागेल्ली, उमेश जेडगी, आशिष एकबोटे, श्रीनिवास पोतु यांच्यासह प्रभागातील शिवसैनिक मोठयासंख्येने उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- प्रभाग १९ मधील शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत विष्णु कारमपुरी (महाराज), भिमाशंकर म्हेत्रे, सचिन गंधुरे, राहुल गंधुरे आदि शिवसेनेचे पदाधिकारी दिसत आहेत.*