आटपाडी,काळेवाडी, जलजीवन चे ५६ लाख योजनेचे पैसे गेले कुठे? आटपाडी पंचायत समिती समोर आंदोलन? – माधवी बागल

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

 

♦️:पिण्याचे पाण्याचे पाईप लाईन पूर्ववत दुरुस्त करून
मीळनेबाबत

काळेवाडी येथे जलजीवनधून पाण्याचे पाइप लाईनचे काम चुकीच्या पद्धतीने केले असून व पहिले काळेवाडी ग्रामपंचायतीची जुनी पाइपलाइन व सिद्धेवाडी स्किमची पाणीपुरवठ्याची पाइपलाइन दोन्ही नमूद केलेली जुनी पाइपलाइनची १००% नादुरुस्त करून ठेवले आहे. तरी नवीन जळजीवनची पाइपलाइन करीत असताना सर्व पाइपलाइन चुकीच्या पद्धतीने केली आहे.सोनू बागल यांच्या जमिनीतून सदरची पाइपलाइनचा मार्गस्थ करून रानाची नासधूस झाली आहे. सदर पाइपलाईन बांधावरून न काढता मधून काढली आहे.आणि रानाची विल्हेवाट लावली आहे सदर पाइपलाइनचे कॉक चुकीच्या पद्धतीने बसवले आहे लोकवस्ती पासून दूर बसवले आहे.
ही सदरची बाब ठेकेदार.उपअभियंता,अभियंता मडके साहेब आणि ठाकूर साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले होते.तरी सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक कोणतीही परवानगी. न घेता पाइपलाइनचा मार्ग चुकीच्या पद्धतीने निर्माण केला आहे मेहेरबान जळजीवन चे काम अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे झाले आहे.
तरी काळेवाडी व सिद्धेवाडीच्या जुनी पाइपलाइन. पूनपणे उध्वस्त करून आमच्या पिण्याचे पाण्याचा प्रश्न बिकट केला आहे तरी काळेवाडी सिद्धेवाडी मधून जुनी पाइपलाइन आम्हाला पुर्वरत
चालू करून मिळावी
अन्यथा काळेवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती आटपाडी ऑफिस समोर तीव्र आंदोलन करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here