लोकदर्शन मुंबई(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर)
उल्हास प्रभात साप्ताहिकाचा यावर्षीचा २८ वा दीपावली विशेषांक 2022 प्रसिद्ध झाला असून आकर्षक मुखपृष्ठ व सजावट यामुळे हा अंक अधिकच सुंदर आणि वाचनीय झाला आहे. यामध्ये …आणि राधा का हसली- सुभाष झेंडे, एका अमावस्येच्या रात्री – रघुनाथ मोहिते, कर्मयोगी डी.बी. जगत्पुरिया, प्रेमाला वयाचे बंधन नसते – राहुल पोवळे, नर्मदेची कथा – विनायक चांदेकर, महातीर्थ क्षेत्र काशी – नयना अशोक मेंगळे, किल्ले चौगाव उपेक्षित पण ऐतिहासिक गड- पंकज शिंदे, ऐतिहासिक पाऊल खुणा वाईच्या – अनघा कुलकर्णी, समजूतदारपणा सुखी जीवनाचे रहस्य – सुगंधा बनोटे, प्रीत न जाणे रीत – सुरेश देहेरकर आदी कथांचा समावेश असून बळीचे राज्य येऊ दे – रामकृष्ण पाटील, मानवता – वसुंधरा सुत्रावे, आली दिवाळी आली दिवाळी – प्रकाश सप्रे, वसा – आनंद देशमुख आदींच्या कवितांचा समावेश आहे तर सोपान बुडबाडकर यांचे संपूर्ण वार्षिक राशिभविष्य आहे. या सोबतच लेख,कथा, कविता, विनोद, मेनू आदींचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. त्यामुळे हा अंक अधिक सुंदर आणि आकर्षक व वाचनीय झाला आहे.
उल्हास प्रभात
किंमत 100/- रुपये पाने 80
संपादक डॉ. श्री. गुरुनाथ पांडुरंग बनोटे
वर्ष २८ वे