लोकदर्शन ठाणे 👉 राहुल खरात
विद्यार्थी विकास कला अकादमी व अखिल भारतीय कला, क्रीडा, सांस्कृतिक अकादमी ठाणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळा काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे संपन्न झाला. ह्या सोहळ्यात मा. अजित कडकडे ह्यांच्या शुभ हस्ते डॉ. प्रवीण निचत ह्यांना राष्ट्रीय सुवर्णरत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रविण निचत ( अध्यक्ष होप फौंडेशन), मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. त्यांचे बदलापूर येथे शतायुषी निसर्ग उपचार केंद्र असून ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना रोगांवर टेलिफोनद्वारे मोफत “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. आत्ता पर्यन्त डॉ. प्रवीण ह्यांना विविध राज्यांच्या राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे एकूण १९२ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
हल्ली त्यांनी ५० पारधी समाजातील कुटुंबांना दत्तक घेतले आहे . त्यांच्या ह्या अश्या नि:स्वार्थ कार्याची दखल अखिल भारतीय कला, क्रीडा, सांस्कृतिक अकादमी, ठाणे ह्यांनी घेतली व त्यांना शॉल, फेटा, मानचिंन्ह स्वरूपात देऊन राष्ट्रीय सुवर्णरत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.