-
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर-
दिवाळी निमित्त शिवजन्मोत्सव समिती अंतरगाव (बु.) च्या वतीने शालेय विद्यार्थ्यां करीता सामान्य ज्ञान, निबंध, कथाकथानक, वक्तृत्व, रनिंग, रांगोळी, चित्रकला व नृत्य अशा प्रकारे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला उपस्थित अध्यक्ष म्हणुन ग्रा.प. सरपंचा सरिता पोडे, विशेष अतिथी म्हणुन ग्रा.प. उपसरपंचा श्यामकला ताई पिंपळशेंडे, प्रमुख उपस्थिती म्हणुन पोलीस पाटील आनंदराव मडावी, त.म.स.अध्यक्ष विनोद सूर , समाजसेवक व संजय गांधी निराधार योजना कोरपना तालुका सदस्य प्रमोद पिंपळशेंडे, जि. प.शाळा सुधारक समिती अध्यक्ष प्रमोद उलमाले,ग्रा.प सदस्य गणेश गिरसावळे आदी उपस्थित.
दोन दिवसीय कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रमोद पिंपळशेंडे यांच्या कडून राष्ट्रसंत तुकाराम महाराज ग्रंथालयाला पुस्तके भेट देण्यात आली. या सर्व स्पर्धेला परीक्षक म्हणुन प्रा.श्रीकांत पिंपळशेंडे, प्रा.अजय मुसळे,प्रा.अरुण मोरे, प्रा.शशिकांत बोबडे, प्रा.पंकज वनकर, प्रा.सतीश उलमाले उपस्थित होते.
आयोजक मंडळा कडून विद्यार्थ्यांकरीता नव-नवीन उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपेश पानघाटे, विपीन टोंगे, स्वप्निल माणूसमारे, अंकित वडस्कर, कुणाल माणूसमारे, रतन निपुगे, सौरभ काकडे, अंकित कळस्कर, नीलेश गुरुनुले, राकेश गुरुनुले, नितेश निपुगे, शेखर बावणे, स्नेहल धोटे, अमित टोंगे, प्रीतेश पाचभाई, वैभव आडकिने, अविनाश पिंपळशेंडे, सूरज हिवरे, संकेत गुरूनुले, प्रज्वल टोंगे, शिवम टोंगे, अतुल कळस्कर, अस्मिता वाघमारे, अश्विनी रामटेके यांनी सहकार्य केले.