अंतरगाव तलाठी कार्यालयाची दुर्दशा

शंकर तडस
कोरपना :
कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील तलाठी कार्यालय मागील अनेक वर्षांपासून पडझड झालेल्या एका खोलीत सुरू आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच तलाठी व इतर कर्मचारी यांना कमालीच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. माजी आमदाराचे हे तालुक्यातील ऐतिहासिक महत्वाचे गाव आहे. येथील पुरातन श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. इतर सुविधाही येथे भरपूर दिसून येतात. मात्र सामान्य जनतेच्या नियमित कामाचे तलाठी कार्यालय अद्याप मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. तेथे शेतीची अत्यंत महत्वाची कागदपत्रे ठेवली जातात. दारे व खिडक्या तुटलेल्या असल्यामुळे या कागदपत्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्ये ची त्वरित दखल घेऊन सुसज्ज तलाठी कार्यालय तयार करावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here