आनंदराव वाय.अंगलवार यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती

.
लोकदर्शन कारंजा लाड/चंद्रपुर👉मोहन भारती
दिनांक 30.10.2022
अखिल भारतीय घुमंतु अर्ध घुमंतु जन जाती वेलफेअर संघ दिल्ली या सामाजिक संघटनेचे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविंद्र कुमार सिंग दिल्ली महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रांतात वाशिम जिल्हा कारंजा लाड येथे विमुक्त जाती भटक्या जमातीचे राज्य स्तरीय अधिवेशन कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन आनंदराव अंगलवार सतत 15 ते 20 वर्षा पासून युवा विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना मुख्यालय चंद्रपुर चे माध्यमातून समाजकार्य करित विमुक्त जाती भटक्या जमातीचे विविध पदावर कार्य करित आले वर्तमान कालात या संटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना चे प्रांतीय कार्याध्यक्ष आहेत.आनंदराव वाय..अंगलवार यांचे विदर्भ सह संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील जनसंपर्क व समाज कार्य भरपूर असल्याने राष्ट्रीय कार्यकारीणी ने यांचे नियुक्ती महाराषट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्त केले व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील राजू अवताडे चित्रकथी समाज जिल्हा अध्यक्ष याचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती पत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन दोघानाही शुभेच्छा देण्यात आले..या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष बालक राम सांशी, राष्ट्रीय महिलां अध्यक्ष डॉक्टर रानू छारी, राष्ट्रीय महासचिव अमरसिंह भेडकूट ,वैभव साखरे, विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते चंदरशेखर कोटेवार सह रमेश शा.जाधव मुंबई,नामां बंजारा, सिमाताई पाखरे, प्रीतीताई तोटावार,स्वाती सुरजूसे ,गणेश सुरजूसे धनराज चौके, दिपक नागपुरे, विनायकराव वददेवार छबन पवार, राजसिह सोलंकी, मंगेश पारिसे ,अरूण सूरजूसे(पाटील) संजय भोसले, सतोषनाथ मोरे सह महाराष्ट्र राज्यातील बहुसंखयेने सामाजीक कार्यकर्ते व हजारोंचे संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यामुळे राज्यात संघटनेचे माध्यमातून विमुक्त जाती भटक्या जमातीचे विविध समस्या बाबत शासनाचे लक्ष वेधून समाज उपयोगी कार्य करण्यास भरपूर संघर्ष करणारे व्यक्तीचे नियुक्ती करण्यात आले म्हणून राज्यातून सर्वच जिल्ह्यातून आनंदराव वाय.अंगलवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here