मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 24 ऑक्टोंबर 2022एक दिवाळी “स्वच्छ उरण सुंदर उरण ” जे करतात , ते उरण नगरपरिषद मधील कंत्राटी कामगार खास त्यांच्यासाठी “मी उरण कर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” यांनी दिवाळी निमित्त फराळ व भेट वस्तू देऊन दिवाळी साजरी केली.मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे उरण नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास एकूण 22 पुरुष आणि 23 महिला उपस्थित होते . महिलांना नवीन साडी , दिवाळी फराळ पॅकेट , आणि पुरुषांना नवीन वस्त्र आणि दिवाळी पॅकेट देण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे उपस्थित होते. मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरणचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर, सदस्य कौस्तुभ साळुंखे , शौनक समेळ , भद्रेश रावल , बादल म्हात्रे , विकास पाटेकर , अमन शर्मा , निखिल म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप केल्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांनी संस्थेचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *