लोकदर्शन 👉.विठ्ठल ममताबादे
उरण दि 24 ऑक्टोंबर 2022
केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर, श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक सुभाषशेठ भोपी,रायगड भूषण भारतदादा भोपी( उपाध्यक्ष – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था)व मित्र परिवार यांच्या सहकार्यातुन पनवेल तालुक्यातील नेरे -भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रमातील आजी आजोबांना गोड खाऊंचे वाटप, ब्लॅंकेट्स, सुगंधी उटण्याचे पाकीटचे वाटप करण्यात आले तसेच दिवाळी पहाट निमित्त सुरेल गीत गायनाचा कार्यक्रम अर्थातच स्वर दीपावली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड भूषण राजू मुंबईकर श्री साई देवस्थान, साईनगर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, भारतदादा भोपी, सुभाषशेठ भोपी, क्रांतीकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, पोलिस पाटील संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष महादू पाटील, आगरी कोळी कराडी सामाजिक संघर्ष संस्थेचे पनवेल तालुकाध्यक्ष – प्रदिप पाटील,कॉनचे उपाध्यक्ष महेश पाटील,काँनचे उरण पूर्व विभाग अध्यक्ष अनिल घरत, गोल्डन ज्यूबीली मित्र मंडळचे अध्यक्ष नवनीत पाटील,ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ उसाटकर, कृष्ठरोग निवारण समितीचे निलकंठ कोळी, संतोष ढोरे, करुणेश्वर वृद्धाश्रमाचे करुणाताई ढोरे, ईश्वरदादा ढोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमा सोबतच उरण तालुक्यातील रानसई येथील खैरकाठी, भुऱ्याची वाडी, खोड्यांचीवाडी,बंगल्यांची वाडी, मार्गाचीवाडी या आदिवासी वाड्यावर आदिवासी बांधवाना दिवाळी फराळाचे पाकीट, रिअल फ्रेश ज्यूस (नारळ पाणी),ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.