अखेर दत्त मंदिर जवळ असलेले दारू दुकानाचे स्थलांतर झाले, ,,,,,,,,,,,,,,,,, कोर्टाचा निर्णय ,,,,,,,,,,,,,,,, नागरिकांनी पेढे वाटून केले स्वागत

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरात मेन रोडवर दत्त मंदिर जवळ असलेले देशी दारू दुकान स्थलांतर करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही केली जात नव्हती, अखेर त्रस्त नागरिकांनी कोर्टात याचिका दाखल केली,व कोर्टात नागरिकांच्या याचिकेच्या बाजूने निर्णय देऊन संबंधित देशी दारू दुकान स्थलांतर करण्याचे आदेश दिले,
या आदेशाचे नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 21 ऑक्टोबर ला पेढे वाटून स्वागत केले, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मधुकर चुणारकर, चरंदास नगराळे, विनोद मोगरे,दत्ता पुरी,बालाजी पुरी,बाबुराव चुणारकर,रोहन काकडे,सौ,चंद्रकला नगराळे,सौ अरुणा चुणारकर,सौ गयाबाई कवलकर, सौ रजनी मोगरे,सौ इटनकर,किसन डोंगरे,सुनील दुर्गे तथा इतर उपस्थित होते,
सदर दारू दुकान स्थलांतर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला व समस्त नागरिकांनी याला सहकार्य केले ,व सामाजिक ऐक्याची लढाई जिंकली,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *