लोकदर्शन 👉प्रिया प्रवीण मयेकर
उल्हासनगर-ठाणे
मिटू दे जगी अंधार याच क्षणाला
मिळूदे जरा सूर्यास न्याय याच क्षणाला
जाग सृष्टीला येऊ दे की उडू दे पक्षी
क्रोध मनाचा नष्ट होऊन याच क्षणाला
चांगले तेच विचार कळावे सा-यांना
हीच दिवाळी नित्य यावी याच क्षणाला
मनाची जरा तळमळ जगास या कळूदेत
मोकळा श्वास येथे मिळवा याच क्षणाला
वसूबारस धनत्रयोदशी बलिप्रतिपदा
कळावी सर्वा नरक चतुर्दशी याच क्षणाला
नवेच विचार नवेच चक्र फिरु दे वेगाने
जगावे असे चाकानेही याच क्षणाला
प्रिया प्रवीण मयेकर
उल्हासनगर-ठाणे
*आजपासून दिवाळी सुरू होतेय….. !!*
*सुख,शांती,समाधान,समृद्धी*,
*ऐश्वर्य, आरोग्य,प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यानीं आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमान होवो….!याच सर्वांना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा*!!