लोकदर्शन. उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि २२.ऑक्टोंबर 2022दीपावली किंवा दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. दिवाळी चा अर्थ आहे प्रकाशाचा सण. म्हणूनच घरोघरी आकाशकंदील व दिपोत्सव करुन आनंदाने सण साजरा करतात. दिवाळी वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुदर्शी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा व भाऊबीज असे तेजोमय सण घेवूनच येते. आणि ह्या दिवाळी सणाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे, यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या दिवाळी निमित्त गड-किल्ले किंवा रांगोळी साकारणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कलांवताना कला गौरव हे ई सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील एक माहिती पत्रक नियमावली वरिल संस्थांद्वारे सोशल मिडीयाद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. कलाकारांनी साकारलेली रांगोळी अथवा गड-किल्ले ह्या सोबतच एक सेल्फी अथवा फोटो आणि आपले पूर्ण नाव २७ ऑक्टोबर पर्यंत ९८७०९५५५०५ ह्या व्हाटस्अप क्रमांकावर पाठविल्यास कलाकारांना कला गौरव हे ई सन्मानपत्र देवून गौरविण्यात येईल असे आवाहन रायगड भूषण मनोज पाटील यांनी केले आहे. आज अनेक कलावंतांमुळे भारतीय सणांची परंपरा कायम स्वरुपी टिकविण्यात मुख्य भुमिका आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सदर विषयांसंदर्भात विविध स्पर्धांचे आयोजन होत असल्याने आमच्याही वतीने त्यांच्या कलेचा गौरव व्हावा ह्या उद्देशाने कला गौरव सन्मानाचे आयोजन हाती घेतल्याचे मत नेहरू युवा केंद्र अलिबागचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी मांडले. खुल्या गटासाठी हे खास आयोजन असल्याने बाल कलाकारापासून ते मोठ-मोठ्या कलाकारांना ही आपली कला सादर करण्याची एक सुवर्ण संधी असल्याने जास्तीत जास्त संख्येने सहभावी व्हावे असे ही यावेळी आवाहन करण्यात आले.