लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 21 ऑक्टोंबर 2022 हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाते यंदा दिवाळी सणाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका तर्फे उरण तालुका चिटणीस विकास चंद्रकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि 24 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6:15 वाजता. मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाउनशिप,उरण येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक गणेश घरत, लीना अभ्यंकर यांचे सुरेल असे गायन होणार आहे. त्यांना पखवाज-क्रिश ठाकूर, तबला जयदास ठाकूर, हार्मोनियम – मिलिंद म्हात्रे, टाळ – प्रकाश जोशी यांची साथ लाभणार आहे. सदर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उदघाटन जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सभापती महादेव बंडा यांच्या हस्ते होणार आहे. जास्तीत रसिक प्रेषकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी केले आहे.