लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे
दिनांक २१ ऑक्टोबर ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शहीद दिन साजरा करण्यात आला. प्रथमता: शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला अभिवादन व पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व कार्य या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करून आदिवासी समाजाला संघटित करण्याचे काम व इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे काम वीर बाबुराव शेडमाके यांनी केले हे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनकर झाडे यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता शाळेतील शिक्षक सुरेश पाटील, राजेश वासेकर, बी.एम. मरसकोल्हे भालचंद्र कोगरे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शशिकांत चन्ने, सिताराम पिंपळशेंडे, प्रभाकर पुंजेकर यांचे सह विद्यार्थी उपस्थित होते.