लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुलांच्या शिक्षणाकरीता आपली आर्थिक बाजू बळकट होण्यासाठी आजची महिला वेळोवेळी लघुउद्योग करीत असते. त्यात आजच्या काळात केकची डिमांड वाढली असल्याने महिला घरी केक बनवून त्याची विक्री करू शकते हे लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपुरने नजिकच्या गावातील २५ महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन मोनीका डे मँडम यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाला कर्नल दीपक डे, महाव्यवस्थापक, सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, किरण करमणकर, अंजली उपाध्येय यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात दिपाली राऊत यांचे द्वारे ७ प्रकारचे विविध केक शिकविण्यात आले.
मोनिका डे मॅडम द्वारे सर्व महिलांना केक बनविण्याचे महत्व तसेच शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.