लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
=== कोरपणा पासुन् 4 किमी अंतरावरील तांबाडी या गावात राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथि निमित्ताने मुख्य मार्गावरील ध्यान मंदीरात् गुरुदेव सेवा मण्डल तांबाड़ी द्वारा मौन श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज व वैराग्यमूर्ति संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमाचे प्रमुख अतिथि चे हस्ते पूजन, व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रामचन्द्रजी बावने यानी सामूदायिक प्रार्थने चे संचालन केले,माजी प्राचार्य संजय ठावरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात दिनकर सोनटक्के यानी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व गीते गाईली तर ठावरी सर यानी महाराजांचे जीवनपट व राष्ट्रसंतानि रचलेल्या ग्रामगीता ग्रंथाचे जीवनात महत्व सांगीतले व तो ग्रंथ पारायणास नसून आचरनासाठी असुन ग्रामशुद्धि करण्यास महत्वाचा उपदेश ग्राम गीतेत असल्याचे प्रतिपादन केले, गुरुदेव सेवा भजन मंडल तांबाडी यानी सुंदर भजन गायली सामुहीक मौन श्रद्धांजली अर्पित करुण राष्ट्रवंदना घेन्यात आली. मिन्नाथ महाराज हंसकर यानी उपस्थिताना मार्गदर्शन केले तर वसंतराव गेडाम यानी सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमास गुरुदेव सेवा मंडल चे सर्व पदाधिकारी, उपासक, गावातिल प्रतिष्ठित नागरिक, बालगोपाल, युवक, आबालवृद्ध बहुसंख्यने उपस्थित होते.