कडापे शाळेत पणती रंगकाम स्पर्धा संपन्न.

लोकदर्शन👉 (विठ्ठल ममताबादे

जेएनपीए दि १८.ऑक्टोंबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील विविध कौशल्ये वाढीस लागावीत या अनुषंगाने दि. १८/१०/२०२२ रोजी उरण तालुक्यातील रा.जि.प.शाळा कडापे येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पणतीवरील रंगकाम व नक्षीकाम स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेचे आयोजन शाळेतील शिक्षकांनी केले होते. ह्या स्पर्धेत शाळेतील १ ली ते ५ वीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे व उपशिक्षक रमेश पाटील यांनी स्पर्धेचे गुणांकन करून विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here