लोकदर्शन 👉 मोहन भारती
*●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●●●*
*सोलापूर दिनांक :- १७/१०/२०२२* सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी १०% बोनस देण्यात यावी या मागणीसाठी कामगार सेनेचे वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारामपुरी (महाराज) यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली
सदर निवेदनात सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात सुमारे ७० ते ८० हजार कामगार असून यात पुरुष व महिलांचा समावेश आहे. हे कामगार लुम चालविणे, जॉबर, मुनीम, डबलिंग, टॉवेल साफ, गाटि मारणे, कोम मशीन चालविणे, शिलाई कामगार व इतर काम करणारे कामगार असून त्या सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी १०% बोनस देण्यात यावी. तसेच गेल्या वर्षी बोनस देण्याबाबत कामगार संघटना व मालक संघटना यांच्याबरोबर करार झाला होता. याप्रमाणे काही यंत्रमाग मालक कामगारांना बोनस दिलेली नाही.
त्याने सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी १० % बोनस लवकरात लवकर मिळवून देऊन कामगारांना न्याय द्यावा असे नमुद करण्यात आले.
याप्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोळी, अभिषेक चिलका, रमेश चिलवेरी, नागार्जुन कुसुरकर, प्रशांत जक्का, रेखा आडकी, राधा आवर आदी उपस्थित होते.
*•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*फोटो मॅटर :- यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी १० % बोनस देण्यात द्यावी या मागणीसाठी कामगार सेनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी श्री गायकवाड यांना लेखी निवेदन कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी दिले. सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर, रमेश चिलवेरी, आदी उपस्थित होते*