औद्योगीक क्षेत्र उपरवाही येथे आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात सरपंच व चार सदस्य कांग्रेस पक्षाचे विजयी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर :-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा विधानसभा क्षेत्रातील ओद्योगीक ग्राम पंचायत उपरवाही येथे कांग्रेस पक्षाचे सरपंच व अन्य सात सदस्य असे ऐकुन आठ सदस्य निवडून आले . एक महिला उमेदवार फक्त दोन मताने निवडणूक हरल्या . उपरवाही येथील ग्राम पंचायत निवडणूकित ऐकून सदस्य संख्या 9 आणि सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली .
कांग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात व विधानसभा समन्वयक अरुण धोटे यांचे मार्गदर्शनात पार पडली व घवघवित यश मिळाले . कामगार नेते विजय ठाकरे यांनी दिलेल्या माहिती नुसार . कांग्रेसच्या सौ. गिताताई साईनाथ सिडाम ह्या सरपंच पदी निवडुन आल्या आहेत तर सदस्य पदासाठी सौ ज्योति सचिन चिकराम , सौ पंचफूला बापूजी काकड़े , सौ मनीषा अनिल मेश्राम व श्री शंकर भाऊराव गुरुकुण्टवार असे पाच तर शेतकरी संघटनेचे गोविंदा गेडाम , अनिल भाऊ कौरासे व सौ प्रतिभा संतोष आत्राम असे ऐकुन तीन सदस्य विजयी झाले . गावाच्या विकासासाठी व युवकाना रोजगार देण्यासाठी नव निर्वाचित प्रतिनिधि प्रयत्न करणार असून विकासनिधि साठी लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे . ह्या निवडनुकित विजयक्रन्ति कामगार संघाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी बजावली , ह्यमध्ये बबन आत्राम , अभय जवाड़े , नरसिंह एमुलवार , दिलीप ठमके , मानसिंह पांचाल , बालू काकड़े , सुधाकर वाड़की , आशीष पिम्पलकर , धनराज पिम्पलशेन्डे , मुकेश पोटे , प्रवीण डाखरे , दिनेश काले , सागर ठमके इत्यादिनी परिश्रम घेतले ,
निवडणूक निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली, गुलाल उधळून जल्लोष केला,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *