लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे )
उरण दि 15 विठ्ठल ममताबादे)
उरण बोरी येथील साई संस्थेच्या नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या सौजन्याने माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत अभियांतर्गत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्णपणे मोफत असणाऱ्या या वैद्यकीय शिबिरांतर्गत माता,स्तनदा माता,किशोर वयीनमुली यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येवून त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यात येणार आहे.त्याबरोबर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपसणी अंतर्गत रक्त दाब,ब्लड शुगर (मधुमेह),सीबीसी,थायरॉईड फंक्शनल टेस्ट,लिव्हर फंक्शनल टेस्ट (एलएफटी-लिव्हर),लिपीड प्रोफाईल( चॉलेस्टेरॉल),रीनल फंक्शनल टेस्ट (आरएफटी-किडनी ),आर.ए.फॅक्टर,आदिची तपासणी करण्यात येणार आहे.
या साठी इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाबासो कळेल आणि त्यांची सर्व टीम आणि या क्षेत्रांतील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.सदरचे शिबीर हे नगराज शेठ सीबीएससी इंटर नॅशनल स्कूल उरण बोरी येथे मंगळवार दिनांक 18 अक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते 12:30 व दुपारी 1: 30 ते 4 वाजेपर्यंत असे दोन सत्रात होणार आहे.या शिबिराचा माता-भगिनींनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आव्हान साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील व उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाबासो काळेल यांनी केले आहे.