लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली व त्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिता चिताडे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की होते, सर्वप्रथम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, प्राचार्या स्मिता चिताडे व उपप्राचार्य विजय आकनूरवार यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता घाटे यांनी केले,संचालन देवराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा नितीन वाढई यांनी केले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,