लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूरच्या अंतर्गत तक्रार समिती (इंटरनल कंप्लेंट समिती ) च्या वतीने दिनांक 8 ऑक्टोब ला”कामाच्या ठिकाणी महिलांचे हक्क (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण कायदा) 2013″ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. व्यासपिठावर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल चिताडे (, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) होते,प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे चे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे , डॉ.स्वप्नील टेंभे, (तालुका आरोग्य अधिकारी)होते,तर या कार्यशाळेसाठी वक्त्या म्हणून ऍड.श्रीमती दीपांजली मंथनवार ,प्राचार्या सौ. स्मिता चिताडे, विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री रामकृष्ण पटले उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी हा कायदा का अस्तित्वात आला यामागील इतिहासावर प्रकाश टाकला. त्यामध्ये राजस्थानच्या भवरी देवी या महिलेवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश हादरून सोडला होता.अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून संसदेमध्ये महिलांच्या संरक्षणाच्या हेतूने विचार मंथन झाले आणि महिलाचे कामाच्या ठिकाणी संरक्षण व्हावे यासाठी 2012 मध्ये हा कायदा बनवावा अशी बाब समोर आली. कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. अनिल चिताडे यांनी कायद्यासोबतच मनातून लैंगिक असमानतेची भावना नष्ट होणे आवश्यक आहे आणि सर्व प्रकारचा भेदभाव आपल्या मधून नष्ट होणे आवश्यक आहे. तसेच स्त्री पुरुष समानता नांदली तरच आपल्या देशाचे भवितव्य उज्वल आहे स्त्री ही सुद्धा एक मानव आहे तिच्यासोबत कुठलाही भेदभाव होणार नाही असा व्यवहार विद्यार्थ्यांनी अंगीकृत करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले. सौ स्मिता चिताडे व श्री रामकृष्ण पटले यांनी कार्यशाळेला विशेष प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे समन्वयक श्री चेतन वैद्य, सहायक प्राध्यापक यांनी विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. तसेच या अनमोल कार्यक्रमासाठी पवन चतारे, चेतन वानखेडे, मनोहर बांद्रे, डॉ. अजयकुमार शर्मा, डॉ. संदीप घोडिले, व डॉ. उत्कर्ष मून हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संदीप घोडिले यांनी मानले.