लोकदर्शन👉.डॉ नंदकिशोर मैंदळकर
*चंद्रपूर :-* भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला खूप महत्त्व आहे परंतु आज शिक्षित मुलींनी कुटुंबाची व्याख्या पती-पत्नी व दोन मुले अशीच केली आहे. विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारलेली आहे त्यातही मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप वाढल्यामुळे घटस्फोटात प्रचंड वाढ झालेली आहे. मुलींना त्यांच्या संसारात रुळू द्या आणि त्यांच्या समस्या त्यांनाच सोडवू द्या असा सल्ला रणरागिणी मंचच्या अध्यक्षा सौ किरण चौधरी यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ किरण चौधरी रणरागिणी मंच गडचिरोली अध्यक्ष, प्रमुख पाहुणे डॉ नंदकिशोर मैंदळकर भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष सौ संगीता बढे रणरागिणी मंच संस्थापक गडचिरोली, सुदर्शन नैताम,मंगला कारेकर, मोहन जीवतोडे, लता दिवटे, ऍड सारिका चांदुरकर, सचिन बरबटकर, कल्पना भोंग, नलिनी लटारे, नीलिमा तिजारे, ऍड नितीन घाटकीने, गंगाधर गुरूनुले, वसंता भलमे, प्रशांत मडावी, प्रदीप गोविंदवार, भुरसे काकू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ किरण चौधरी आपल्या उधबोधनात म्हणाल्या एकत्र कुटुंब पद्धती ही भारताला खूप मोठी देन आहे तिचा ऱ्हास होताना आज उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत विभक्त कुटुंब पद्धती वाढली आणि मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप, ढवळाढवळ सुरू झाली त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारत घटस्फोटाची राजधानी होते की काय अशी भीती वाटत आहे. मुलींना त्यांच्या संसारात रुळू द्या त्यांच्या समस्या त्यांनाच सोडवू द्या. त्यांना जबाबदाऱ्या समजू द्या. त्यांच्या संसारातील लुडबूड थांबवा. कायद्याने महिलांच्या बाजूने झुकते माप दिले असल्यामुळे विवाह संस्था धोक्यात आलेली आहे. काही महिलां त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करून हसत्या खेळत्या परिवाराला उध्वस्त करीत आहे. पत्नीच्या संकटात पती संकट मोचक म्हणून उभा राहतो. त्याच पतीला गजाआड करण्याची खुमखुमी दाखविता या कुठला शहाणपणा ? महिलांचे शिक्षण आणि करिअर करण्याचा अट्टाहास याला कारणीभूत असल्याचे मानले जाते. डॉ नंदकिशोर मैंदळकर म्हणाले एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबामुळे मुलांवर होणारे संस्कार आणि मिळणारी सुरक्षितता पाळणाघरात किंवा संसार संस्कार वर्गात मिळू शकत नाही. तान तणावाचे समाधानकारक उत्तर विभक्त कुटुंब पद्धतीत मिळू शकत नाही. तरीपण सासू-सासरे फोटो पुरते चालेल, त्यांनी घरी राहता कामा नये, त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्यात येतात, स्वतःचे मूल आजी-आजोबा पासून दूर करून संस्कार विहीन करता यात कुठला शहाणपण. मुलींनो सावरा, आपले कुटुंब सांभाळा “भांडा पण जरा जपून” प्रकरण तुटेल एवढे ताणू नका यात नुकसान सासर आणि माहेर या दोघांचेही आहे यात नैराश्य येते आणि त्याचा शेवट घटस्फोटापर्यंत जातो असे डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी उपस्थितांना कळकळीची विनंती केली. याप्रसंगी नागरिकांची मोठी उपस्थिती होती