लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
12 ऑक्टोबर ला मॅजिक बस प्रकल्पांतर्गत जि. प. उच्च प्राथ. शाळा ,मानोली खुर्द येथे कन्या दिवस, साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जी. व्ही. पवार केंद्र प्रमुख ,होते, मार्गदर्शक व पर्यवेक्षक श्री. योगेश व श्री. महेश सर मॅजिक बस, तथा जेष्ठ शिक्षिका सौ. संध्या थिपे , कु. प्रतिभा रायपुरे , मिना राजुमंच प्रमुख सिता मेश्राम. होत्या.
मुलगा-मुलगी एकसमान, स्त्री भृनहत्या, मुलींचे स्थान, या विषयावर चित्रकला व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली, विद्यार्थीनीनी स्त्री शक्तीवर खुप सुंदर मनोगत व्यक्त केले, चित्रांतून मुलगी वाचवा, देश वाचवा. बेटी पढाओ, बेटी बचाओ. अशी श्लोगन व चित्रातून सुचित केली.
चित्रांची निवड करुन प्रथम क्रमांक श्रावणी, द्वितीय क्रमांक समिष्का, तृतीय क्रमांक शिवानी व प्रोत्साहनपर बक्षीस सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना कंपास साहित्य, पेन, पेन्सिल, नोटबुक व चॉकलेट देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम सोयाम इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांनी केले, तर आयोजन विषय शिक्षक राजेश पवार व सहा. शिक्षक वनपाल सोयाम यांनी केले, आभार, शाळेचे मुख्यमंत्री समिर लांडगे यांनी मानले.
,,फोटो,,