लोकदर्शन👉 मोहन भारती
कन्हाळगाव ग्रामवासीयांना आव्हान सरपंच,सदस्य पदी उभे असलेल्या उमेदवारांना विजयी करा केंद्र व राज्य शासनाचा विकास निधी कमी पडू देणार नाही
मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचे आव्हान
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर, श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री सतीशजी उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर,श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, श्री अनिल ढासले,श्री दिपक गारघाटे,श्री रामदास भाऊ कौरासे,श्री दिवाकर मालेकर,श्री श्रीकृष्णजी पडोळे सर व ग्रामपंचायत उमेदवार सौ मंदाताई ना हिवरकर ( सरपंच ),श्री नारायण हिवरकर,श्री सुनिल ढासले,श्री आनंदराव शेडमाके,सौ विठाबाई बांदुरकर,सौ संगीताताई गेडाम,सौ नंदाताई संतोष कोराम,सौ अनिताताई केराम आदी मान्यवर उपस्थित होते मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे कन्हाळगाव येथील महिलांनी भव्य स्वागत केले व गावात रॅली काढून श्री गज्जलवार यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी जेष्ठ नागरिक श्री मारोती वाघाडे व सौ चंद्रकलाबाई वाघाडे या दाम्पत्याच्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य उमेदवारांचे स्वागत केले व विजयी भवचा आशीर्वाद दिला माझी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले केंद्रात,राज्यात व जिल्ह्यात मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार वन, सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय व पालक मंत्री असुन ग्रामपंचायत मध्ये विकास कामे घडवून आणण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सदस्यापदी उभे असलेल्या उमेदवारांना विजयी करा केंद्र व राज्य शासनाचा विकास निधी कमी पडू देणार नाही तसेच श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या नेतृत्वात कन्हाळगाव येथील ग्रामपंचायत मध्ये भाजपा चे अधिकृत उमेदवार असुन सर्व नागरिकांनी भाजपा व मित्र पक्षाच्या पाठीशी राहुन सर्व सरपंच व सदस्य पदी उभे असलेल्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले तसेच श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले कार्यक्रमाला गावातील नवयुवक,नागरिक, महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री विशाल गज्जलवार यांनी केले तर आभार श्री पुरुषोत्तम भोंगळे ग्रामपंचायत प्रभारी यांनी मानले