लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 13 ऑक्टोंबर
रायगड भूषण राजू मुंबईकर व श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या संस्थापक रायगड भूषण संगीताताई ढेरे यांच्या माध्यमातून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून डाबर वाटिका शाम्पू आणि नारळपाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले.दिवाळीची अनोखी भेट भेटल्याने विद्यार्थी आनंदात होते. शिक्षक व विद्यार्थ्यानीं रायगड भूषण राजू मुंबईकर व रायगड भूषण संगीता ताई ढेरे व उपस्थितांचे आभार मानले.
स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर पप्पूदादा सूर्यराव,महेश पाटील ( उपाध्यक्ष कॉन), अंकित नाईक ( विभाग प्रमुख उलवेनोड कॉन ), आदेश पाटील ( अध्यक्ष मोरावे शाखा कॉन ), विकी रविंद्र(खजिनदार कॉन ), समिर म्हात्रे ( जासई विभाग प्रमुख कॉन ), नितीन लाड ( अध्यक्ष पाटणोली विभाग कॉन ),श्रावणी वानखेडे (उरण महिला अध्यक्ष कॉन ),सुरेंद्र पाटील ( वेश्वि अध्यक्ष कॉन ), सुनिल वर्तक ( अध्यक्ष गोवठणे विकास मंच),राजेंद्र भगत( सुप्रसिद्ध निवेदक ),अनिल घरत ( उरण तालुका सचिव- आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ),गोपाळ म्हात्रे ( आंतरराष्ट्रीय कराटे कोच),संपेश पाटील( मित्र परिवार अध्यक्ष ), रोशन पाटील (मित्र परिवार उपाध्यक्ष ),क्रांती म्हात्रे ( मित्र परिवार कार्याध्यक्ष ) आणि आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अप्पासाहेब मोरे, सतीश मोरे, शिवाजी साळुंखे, सरोजिनी मढवी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग,आश्रम शाळेत सर्व विद्यार्थी वर्ग आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.