लोकदर्शन 👉 रुपेश चुदरी
गडचांदूर: आदिवासी, दुर्गम आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आमदार सुभाष धोटे यांनी खरा लोकनेता असल्याचे सिद्ध केले आहे असे प्रतिपादन चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
राजुरा विधानसभेचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात खासदार बोलत होते. यावेळी सार्वजनिक उत्कृष्ट शारदा देवीं मंडपात सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यासोबत आमदार सुभाष धोटे यांच्या कार्याविषयी चित्रफीत देखील यावेळी दाखविण्यात आली.
याप्रसंगी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगराध्यक्ष राजुरा अरुण धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर अरुण निमजे, तालुका काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्ष गडचांदूर सविता टेकाम, गडचांदूर शहर अध्यक्ष संतोष महाडोळे,पापय्या पोनमवार, विक्रम येरणे, अरविंद मेश्राम,राहुल उमरे,जयश्री ताकसांडे,अर्चना वांढरे,हंसराज चौधरी,नोगराज मंगरुळकर,शिवकुमार राठी, तसेच राजुरा,कोरपना,जिवती येथील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थिती आमदार सुभाष भाऊ धोटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
व नवरात्री मधे गडचांदूर शहर काँग्रेस व युवक काँग्रेस च्या माध्यमातून सचिन भोयर यांच्या आयोजनातून शारदा महिला मंडळांकरिता गडचांदूर शहरात स्पर्धा राबविण्यात आली. त्या मध्ये प्रथम क्रमांक स्त्री शक्ती शारदा मंडळ,द्वितीय नौसेना शा. म.मं, तृतीय साधना शा.म.मं. व चतुर्थ,पाचवे त्याच बरोबर सर्व सहभागी मंडळांना प्रोत्साहन बक्षीस ,शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, या कार्यक्रमा करिता यशस्वी त्याकरिता युवक काँग्रेस अध्यक्ष रुपेश चुदरी,सुनील झाडे,प्रीतम सातपुते,मसूद सय्यद,संजय चिकटे, तुकाराम चिकटे,चेतन शेंडे,विजय अंड्रस्कर,बादल पेचे, इंदर कश्यप योगेश चौधरी गणेश आदे योगदान लाभले.या कार्यक्रमाचे संचालन सतिश बेतावार व उध्दव पुरी तर प्रास्ताविक शहर काँगेस अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष अतुल गोरे यांनी केले.