लोकदर्शन वालूर 👉 महादेव गिरी
वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेतील १ ली ते १२ पर्यंतच्या विद्यार्थी संख्येत होणारी वाढ व त्यांच्या आरोग्यदृष्टिकोनातून वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या वतीने ५ लक्ष रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वाटर फिल्टरचा शुभारंभ रवीवारी मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आला.आत्ता विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द थंड पाणी मिळणार आहे.
कार्यक्रमास उद्घाटक म्हणून पत्रकार गोपीकिशन दायमा यांची तर अध्यक्षस्थानी रमाकांतअण्णा चौधरी यांची उपस्थिती होती. सत्कारमुर्ती म्हणून विशेष उपस्थितीत संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गणेशराव मुंढे,शेख ईस्माईल अन्सारी,ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी कलाल,धारूजी धाबे,सतिश कलाल,सरेश अंभोरे,श्याम शेळके,कुरेशी,अच्युतराव आंधळे,लक्ष्मणराव बोराडे, पत्रकार राहुल खपले,शेख बब्बु यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रारंभी गोपीकिशन दायमा यांचे हस्ते वाटर फिल्टर केद्राचे उद्घाटन करण्याचा आले.तसेच वाल्मिकी जयंती निमीत्त महर्षी वाल्मिकी ऋषी प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी शारदा बादाड,अस्मिता कांगणे,राजनंदीनी जाधव,ऋतुजा रोकडे यांनी स्वागतगीत सादर केले.
या आश्रमशाळेतील १ ली ते १२ वी पर्यंत निवासी ३२० व अनिवासी ९९० अशा १३१० विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वाल्मिकी शिक्षण संस्थेच्यावतीने खोली बांधकाम व यंत्रसामुग्री यासाठी ५ लक्ष रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वाटर फिल्टर केंद्राचा शुभारंभ केल्याबद्दल पालकांच्या वतीने संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बालाजी हारकळ,शेख ईस्माईल, सुरेश अंभोरे, गोपीकिशन दायमा यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले तर संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांनी सत्काराला उत्तर देतांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्राचार्य रमेश नखाते यांनी केले तर सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले.मुख्याध्यापक श्याम मचाले यांनी अभार मानले.यावेळी विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व वसतीगृह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
▪️विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करावे : अनिलराव नखाते.
वालूर येथील निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.याशिवाय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकही प्रयत्नशील आहेत.विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून ते पुर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतीने अभ्यास करून स्वप्नपूर्ती करावी असे अवाहन संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांनी बोलतांना केले.तसेच शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवतेसाठी सजग राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे मत त्यांंनी व्यक्त केले.तसेच सत्कार करून सन्मान केल्याबद्दल अनिलराव नखाते यांनी पालकाप्रती ऋण व्यक्त केले.