——————————————
लोकदर्शन उस्मानाबा👉राहुल खरात
दि.९ उस्मानाबाद येथील साहित्यिक प्रा.राजा जगताप यांचे “गाव तेथे बुध्द विहार” या लोकप्रिय कादंबरीला नुकताच ढोकी येथील अखिल भारतीय बोध्दजन कल्याण संघटना व श्रावस्ती बुध्द विहार यांचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यानिमित्ताने हरीभाऊ घोगरे हायस्कूल उपळे(मा.)ता.जि.उस्मानाबाद येथील सेवानिवृत्त शिक्षक व सध्या शिंगोली येथे स्थाईक झालेले मा.चौधरी सर यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी वर्षावासात “बुध्द पुजापाठ “ग्रथाचे वाचन आषाढी पौर्णिमेपासून ते ९आँक्टोंबरच्या अश्विन पौर्णिमेपर्यंत केले होते.वर्षावासाची सांगता करताना चौधरी सरांनी आपल्या शिष्याला प्रा.राजा जगताप यांना घरी बोलावून वर्षावास समाप्ती दिवसी बुध्दपुजापापाठ करायला लावून ९आँक्टोंबर रोजी अश्विन पौर्निमेनिमित्त त्यांचा सत्कार केला व बदलत्या काळातही गुरू—शिष्याचे नाते किती अतुट व घनिष्ठ असते ते दाखवले आहे.
यावेळी माझा एकेकाळचा८वी ते१०वीचा विद्यार्थी राजा जगताप टाकळी (बे.)सारख्या खेडेगावातील गरीबीवर व परिस्थितीवर मात करत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राध्यापक तर झालाच शिवाय “गाव तेथे बुध्द विहार कादंबरी”लिहून समाजातील तरूणांना संस्कारित करण्याचे कार्य केल्याने व गूरू शिष्याचे नाते अखंड टिकविण्यासाठी सत्कार करताना कुटुंबीयांना वेगळाच आनंद प्राप्त झाला आहे.अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
जीवनामध्ये आपल्याला घडवणा—या गुरूंचे स्धान नेहमिच उच्यस्थानी असते आपण कितीही मोठे झालो त्यापाठीमागे गुरूच असतात त्यामुळे आपण नेहमिच चांगल्या गुरूंना नतमस्तक झाले पाहिजे व त्यांची विचारपुस केली पाहिजे त्यामुळे गुरूंना जगण्याची ताकद मिळते. ३२वर्षांनी सरांनी घरी बालावून कौटुंबीक सत्कार केल्याने आनंद झाला आहे अशी प्रतिक्रीया राजा जगताप यांनी व्यक्त केली आहे.