लोकदर्शन 👉नितेश केराम
राष्ट्रभक्ती एकात्मता या सह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरीकांमध्ये सामाजिक दायित्वाच अंकुर फुलविन्याचे काम कोरपना सामाजिक कार्याच्या माध्यमातूनही सामाजिक आणि शैक्षणिक कार्य, गेल्या आठ वर्षा पासून स्टुडन्ट फोरम ग्रुप कडून अविरतपणे सुरु आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून कायम लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीची, सामाजिक कार्याची शिक्षणाची, ज्योत तेवत ठेवणाऱ्या स्टुडन्ट फोरम ग्रुपचे संपूर्ण तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात शैक्षणिक उपक्रम रक्तदान शिबीर सोबतच विविध खेळाचे प्रतियोगितांचे आयोजन होतकरुंना मदत या सारखे सामाजिक कार्यत्वाचा संदेश देणारे कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते.युवकांना करिअर बाबत मार्गदर्शन करून गरीब होतकरू विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येते.
या वेळेसही स्व मारुती बाबाराव डांगे यांच्या स्मृतित्यर्थ स्टुडन्ट फोरम ग्रुप यांचे तर्फे कोरपना येतील होतकरू तरुण स्वप्नील बोंमपलीवार यास हातगाडी सुपुर्दकरण्यात आली.