गणेश वाजेकर यांचा भाजप मध्ये पक्षप्रवेश.

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 5 ऑक्टोम्बर उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश(रवि)वाजेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उरण मधील आ.महेश बालदी यांच्या कार्यालयात भाजप मध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला.

गणेश वाजेकर हे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे जवळचे मित्र आहेत. काही
दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी शिवसेनेला सोडचिट्टी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. तेव्हा पासून
गणेश वाजेकर अस्वस्थ होते.शेवटी विजय
भोईर यांच्या मार्गदर्शनाने गणेश वाजेकर यांनी भाजप मध्ये जाहिरपणे पक्ष प्रवेश केला.भाजपा तालुकाध्यक्ष रवि भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,पळस्पे सरपंच चंद्रकांत भोईर, सुधीर घरत, जयप्रकाश पाटील, महेश कडू,शेखर तांडेल,सुनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश वाजेकर यांनी जाहिर पक्ष प्रवेश केला.यावेळी धर्मेन्द्र माळी,योगेश तांडेल,प्रमोद तांडेल,साईनाथ पाटील,धर्मेन्द्र तांडेल,जयदास तांडेल,हसुराम तांडेल,गणेश कडू,रोशन भोईर आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.गणेश वाजेकर हे सुरवातीला भारतीय जनता पार्टीत होते त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. आता मात्र जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर हे भाजप मध्ये गेल्याने गणेश वाजेकर यांनीही भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. गणेश वाजेकर यांची घरवापसी झाल्याने आ. महेश बालदी यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.संपूर्ण नवघर गाव तसेच जिल्हा परिषद मतदार संघ भाजपमय करणार असल्याचा निश्चय विजय भोईर यांनी यावेळी केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *