किल्ले मर्दनगडावर मर्दनगड संवर्धन समिती व बा रायगड परिवारातर्फे दसरा सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 6.ऑक्टोंबर आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या अनुषंघाने सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या आवरे येथील मर्दनगड किल्यावर मर्दनगड संवर्धन समिती व बा रायगड परिवारातर्फे दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहाने व श्रध्देने साजरा करण्यात आला.

मोठया संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवभक्तांनी प्रथमतः गडाची साफसफाई केली. गडाला तोरण बांधून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले . मर्दनगडाचे गड पूजन केल्यानंतर भगवा ध्वज फडकविण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौशिक ठाकूर ,शंकर पाटील,दिलेश ठाकूर, विजय गावंड,दिपेश ठाकूर, सुजित ठाकूर, तुषार म्हात्रे,मयुरेश पाटील ,संजित भोईर, ओंकार गुलप, प्रशांत अत्तिरकर,सुदर्शन घवाळी , शिर्के ,नितीन बोडेकर,सुनील दिवे ,प्रसाद खैरणार डोंबिवली,कल्पेश भोकरे ,अक्षय धुरी,स्वरांग ठाकूर, स्पंदन ठाकूर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *