लोकदर्शन 👉 मोहन भारती
गड़चांदूर..
गडचांदूर येथे भारत स्काऊट – गाईड, एन.सी.सी. व इको क्लबच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पवन बेले, श्री रविंद्र जेना, श्री संजय भटकर, श्री मधुकर धारपुरे, श्री मोरेश्वर भांगे, श्रीमती प्रतिमा चंद्रागडे यांनी दीपप्रज्वलन करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी कु. इलाक्षी रामटेके, लतिका काटोले आणि गिझल गौर या विद्यार्थीनींची प्रसंगोचित भाषणे झालीत. विद्यालयातील संगीत शिक्षक श्री संजय कन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली कु. वेदांती मंदे, नारायणी वागळे, प्रतिक्षा उरकुडे, श्रूती बोढे, नूतन व रचना या विद्यार्थीनींनी ‘वैष्णव जन तो’ या सुरेल आवाजातील भजनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. नुतन उरकुडे या विद्यार्थ्याच्या तबलावादनाने भजनात आणखीनच रंगत आणली.
त्यानंतर माणिकगड सिमेंट वसाहत व परिसरात स्वच्छता अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्काऊट गाईड, एन सी सी , इको क्लब तसेच बॅन्ड पथकातील विद्यार्थ्यांनी या रॅलीत सक्रिय सहभाग घेतला.