लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गंडचादूर येथील साई मंदिरच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्या मुळे नागरिक हैराण झाले आहे
दिनांक ४ ऑक्टोबर ला गंडचादूर येथील साई मंदिराच्या परिसरातील नागरीकांनी,नगरपरिषदेला या परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी भास्कर राव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवेदनात
साई मंदिराजवळ असलेला ओपण स्पेसवर काही ठेकेदार लोक,रेती गिट्टी टाकून संपूर्ण ओपन स्पेस रेती गिट्टीने व्यापून टाकला आहे.
सदर परिसरात अंगणवाडी असल्यामुळे अंगणवाडीच्या आजुबाजूने गवत व्यापलेले आहे,लहान मुलाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
या परिसरात नगरपरिषदचा कोणताही साफसपाई करणारा कर्मचारी येऊन साफ करीत नाही.
ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही,त्यामुळे,दारू पिऊन लोक दारूच्या बाटल्या परिसरात टाकत असतात.
ओपन स्पेसच सौंदर्यकरण करण्यात यावे.
इत्यादी मागण्यासाठी निवेदण देताना प्रणय खणके.रावसाहेब पवार, अन्ना,मयूर पांचभाई उपस्थित होते.
,