लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ४ ऑक्टोंबर उरण तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य असं पुनाडे गांव सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपणारं गांव !या गावात अनेक सामाजिक संस्था आपल्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपलं सामाजिक दायित्व जपत असतात!तर अनेक सांस्कृतिक मंडळ आपल्या सण – संस्कृतीच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपतानां दिसतात ! त्यातलच एक नाव सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ पुनाडे हे पुनाडे गावांतील नावाजलेलं सांस्कृतिक मंडळ. अश्विन मासातील शारदीय उत्सवाच्या काळात आपल्या मंडळाच्या आयोजनातून सुंदर अश्या मंडळात नवसाला पावणाऱ्या दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिस्थापना करून चालणाऱ्या ह्या पावन पवित्र उत्सवाच्या दिवसांत अनेक सामाजिक ,सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करून आपल्या मंडळाच्या माध्यमातुन गेली वीस वर्षे सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे मंडळ आज आपल्या ५० ( पन्नास ) सभासदांच्या एकत्रित पणाच्या एकजुटीतून साकारत असलेल्या ह्या भक्तिमय उत्सवाच्या माध्यमातून फक्त हे मंडळ आपल्या गावांपुरतं मर्यादित न राहता आजूबाजूच्या परिसरात नावारूपाला आलं आहे.
गेली वीस वर्ष सांस्कृतिक कार्या सोबतच सामजिक कार्याची अखंड परंपरा जपणारं हे सेवाभावी मंडळ आज पण गावाची एकता आणि अखंडता कायम टिकून राहावी या करिता मंडळातील सर्व सदस्य एकत्रित येऊन गावांत सामाजिक सांस्कृतिक,कला ,क्रीडा अश्या प्रकारच्या अनेक कार्यक्रमांच आयोजन करून आपल्या मंडळाच्या माध्यमातून गावाचं नांव मोठं कसं करता येईल हा एकच ध्यास मनाशी बाळगून समाजहातांची अनेक कामं देखील करत असतात.
नवदुर्गा मातेच्या उत्सवाच्या काळात सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ पुनाडे या मंडळाच्या वतीने उत्सवाच्या दिवसांत विविध कार्यक्रमांच अयोजना केलं जातो हे सर्व करत असताना मंडळातील सर्व सभासदांचं योगदान वाखाणण्याजोग असंच असतं !उत्सव काळात सांज- सकाळी मातेच्या चरणी धूपआरती करून मनोभावे पूजा अर्चा केली जाते सोबतच आपल्या सण -संस्कृतीच आपल्या परंपरेचं,अस्मितेच जतनं व्हावं म्हणून आपल्या वारकरी परंपरे नुसार सुश्राव्य भजन – कीर्तनाच्या रूपाने भक्तिमय कार्यक्रमाद्वारे भाविकांना ह्या आनंदमय पर्वणीतून मंत्रमुग्ध करून दुर्गामातेची आराधना केली जाते सोबतच खास महिलां भगिनींकरिता आणि बाळगोपालां करिता विविध मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन देखील केलं जातोय व रात्रीच्या वेळी दुर्गामातेच्या मंडपात भक्तगण विविध प्रकारच्या वेशभूषा करून गरबानृत्य सादर करत आपला आनंदोत्सव साजरा करतानां दिसतात आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या आणि बेंजोच्या गजरात भव्य मिरवणूक काढत दुर्गामातेच विसर्जन केले जातेय !हे सर्व पाहता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि भक्तिमय वारसा जपणाऱ्या सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ पुनाडे या सेवाभावी मंडळाच्या आयोजनातून साजरा होणारा हा नवरात्री उत्सव सर्वांपुढे एक आदर्श निर्माण करणारा असाच आहे !आणि म्हणून पुनाडे गावांत साजरा होणारा हा दुर्गामातेचा उत्सव ही वीस वर्षांची अखंड परंपरा सांगण्या ऐकण्याची नव्हे तर अनुभवायची गोष्ट आहे !आणि म्हणूनच हा आनंदोत्सव, ही परंपरा जर पहायची असेल, अनुभवायची असेल तर या नवरात्रीच्या उत्सव काळात पुनाडे गावांतील या आदर्शवत अश्या सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळच्या ह्या उत्सव सोहळ्याला एक वेळ जरूर भेट द्यायला हवी.