लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरोना मुळे 2 वर्ष नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही
मात्र यावर्षी कोरोना चे निर्बंध उठविल्यामुळे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत. शहरातील अचानक मंदिर, कन्यका मंदिर,व अमलनाला रोडवरील भवानी माता व महालक्ष्मी मंदिरात महिला भाविकांची गर्दी दिसून येत आहेत,
शहरात 40 व ग्रामीण भागात 75 सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवी व शारदादेवी ची प्राणप्रतिष्ठा केली आहेत, शहरातील प्रमुख रस्त्यावर आकर्षक विद्दुत रोषणाई केली आहेत, दांडिया बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहेत, विविध प्रकारच्या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहेत, महिलांचा उत्साह वाढला आहे, शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक,पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले जातीने लक्ष देत आहेत.