लोकदर्शन👉 मोहन भारती
जनतेशी संवाद, महात्मा गांधींना अभिवादन, देवींचे घेतले दर्शन.
राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे , २५ १५ आमदार निधी अंतर्गत २० लक्ष रुपये निधी च्या दोन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी आ. धोटे यांनी स्थानिक जगन्नाथ महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले, शारदा देवी, दुर्गा देवींचे दर्शन घेतले, रामपूर येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, अनेकांची निवेदने स्विकारून विविध विकास कार्य पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच सुनिता उरकुडे, माजी सरपंच मंजुषा खंडाळे, रमेश रणदिवे, रमेश कुडे, माजी उपसरपंच रतन गर्गेलवार, ग्रा. प सदस्य जगदिश बुटले, रमेश झाडे, लताताई डकरे, विलास कोदरीपाल, सिंधुबाई लोहे, अनिता आडे, लक्ष्मी चौधरी, हेमलता ताकसांडे, अजय सकिनाला, अनंता एकडे, प्रभाकर बघेल, सुरेश चन्ने, संतोष शेन्डे, कोमल पुसाटे, विनोद कावडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, हारुण शेख, भुपेष मेश्राम, रवींद्र लोहे, बाळू पिदुरकर, आत्माराम शेंडे, गोपाल बुरांडे, शालिक पोल्हे, विठ्ठल रासेकर, रामदास गिनगुले, एकनाथ खडसे, दिलीप मुडपल्लीवार, नामदेव लांडे, देविदास वांढरे, विजय कानकाटे, भाऊराव ठावरी, दिनकर ढोबे, विश्वास जंजर्ला, श्याम बोघा, विठ्ठल रासेकर, मनोहर कोल्हे, क्रिष्णा खंडाळे, अतुल खनके, पंडित ढोबे, गोपाल भगत, दशरथ मरचापे, अशोक मून, भाऊराव इटणकर, सतीश चौधरी, इंदुताई जांभुळे, मंदाताई रासेकर, शीलाताई लांडे, लता ढोबे, शारदा लांडे, सरोजिनी हिवरे, अनिता नेहारे, सिमा खडसे, मंदा पोल्हे, वर्षा रोगे, सुवर्णा चोखारे, शितल पोटे, सुनिता जमदाळे, सोनू बुटले, संध्या पिदुरकर यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.