ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दिव्यांग तपासणी शिबिरात 254 रुग्णांना केली तपासणी

 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉,,(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्रामीण रुग्णालय गडचंदूर येथे 1 ऑक्टबर 22 ला दिव्यांग तपासणी शिबिरात 254 रुग्णांची नोंद झाली त्या पैकी 58 ऑर्थो,15 मेडिसीन,85 एम आर सी पी,25 ई एन टी आणि 16 ऑपथालिक असे एकूण 199 दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करीता पात्र ठरले.
नगराध्यक्षा श्रीमती साविताताई टेकाम, श्रीमती मिनाक्षी एकरे,विक्रम येरणे ,राहुल उमरे व इतर मान्यवर नगर परिषद सदस्यांनी महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन केले. सामान्य रुग्णालय चंद्रपूर च्या चमूने दिव्यांग रुग्णांची तपासणी केली व प्रमाणपत्र 45 दिवसांनी ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर संबंधितांना फोन करून वितरित करण्यात येईल.रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी शिबिर सफल करण्यासाठी प्रयत्न केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *