लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
घुग्घुस येथील प्रयास सभागृहात गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे आयोजित दांडिया उत्सव-२०२२ दांडिया व गरबा नृत्य स्पर्धा संपन्न झाली
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख मार्गदर्शक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, विनोद चौधरी, अमोल थेरे, संजय भोंगळे, बबलू सातपुते, साजन गोहने, राजेश मोरपाका, सचिन कोंडावार, सतीश बोंडे, स्वामी जंगम, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, रवी चुने, धनराज पारखी, कोमल ठाकरे, कार्यक्रमाचे संयोजक अर्चना भोंगळे, किरण बोढे, नितु चौधरी मंचावर उपस्थित होते.
भाजपा महिला आघाडी व प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे आयोजित दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेला घुग्घुस वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला व युवतीनी मोठया संख्येत स्पर्धेत भाग घेतला.
दांडिया व गरबा स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्या युवती गटातील प्रथम पारितोषिक ३००१/- व ट्राॅफी पौर्णिमा खुटेमाटे, द्वितीय पारितोषिक २००१/- व ट्राॅफी प्रियांका इसारप, तृतीय पारितोषिक १००१/- व ट्राॅफी अश्विनी झाडे तसेच २५ प्रोत्साहन पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
विजेत्या महिला गटातील प्रथम पारितोषिक ३००१/- व ट्राॅफी अश्विनी कोंगरे, द्वितीय पारितोषिक २००१/- व ट्राॅफी श्वेता पाझारे, तृतीय पारितोषिक १००१/- व ट्राॅफी मनीषा ढवस तसेच २५ प्रोत्साहन पारितोषिक व प्रत्येक बालिकांसाठी आकर्षक बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
दांडिया गरबा स्पर्धेत महिलांनी व युवतीनी मोठया संख्येत उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.
दांडिया व गरबा डान्स बघण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.