शहरातील प्रत्येक मतदारसंघातून २ हजार शिवसैनिक जाणार दसरा मेळाव्याला* *शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेची बैठक – जिल्हाप्रमुख – पुरुषोत्तम बरडे*

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

*सोलापूर दि. *३०/०९/२०२२* :- शिवसेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून २ हजार शिवसैनिक जाणार आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृहावर झाली.
जिल्हाप्रमुख श्री. बरडे म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तो विचार नाही. परिणामी बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा काहीही उपयोग होणार नाही असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य माणसे शिवसेनेबरोबर येण्यास तयार आहेत. ही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. तेच शिवसैनिकांचे खरे भांडवल आहे. त्यामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अतिशय गांभीर्याने या विषयात काम करावे. शिवसैनिकांना मिळालेल्या या लढाईच्या संधीचे सोने शिवसैनिकांनी करावे. आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले. यावेळी शिवसेना राज्य विस्तारक शरद कोळी, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज), उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, शहर प्रमुख भक्तीताई जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, माजी विरोधी पक्षनेता रमेश व्हटकर, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, रेवण पुराणिक, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, अनिल कोंडूर, सचिन गंधुरे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख ऋषिकेश धाराशिवकर, सुरेश जगताप निरंजन बोद्धुल, लहू गायकवाड, आनंद बुक्कानुरे, बाळु पवार, विजय काकडे, अनिल दंडगुळे, विठ्ठल कुऱ्हाडकर, अमर बोडा, ननवरे, रेखा आडकी, लक्ष्मीबाई ईप्पा, राधा आवार, गुरूनाथ कोळी, प्रशांत जक्का, अजय कारमपुरी, शिवा सारंगी, बालाजी मेतकु, गणेश म्हंता, लहु गायकवाड आदी उपस्थित होते.
शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपूरी (महाराज) यांनी प्रास्ताविक केले. शहर संघटक अतुल भवर यांनी सूत्रसंचालन तर उपशहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- मुंबई येथील दसरा मेळाव्यास जाण्यासंदर्भी सोलापूर शिवसेनेच्या वतीने नियोजन बैठक घेण्यात आले. सदर प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, व्यासपिठावर विष्णु कारमुपरी (महाराज), उत्तमप्रकाश खंदारे, प्रताप चव्हाण, बालाजी चौगुले, अतुल भवंर, अस्मिता गायकवाड आदि दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here