सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन नेते गौतम रत्ने यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा  :– राजुरा तालुक्यातील मौजा भुरकुंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन नेते गौतम लिंगाजी रत्ने यांनी दिनांक ३० सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी शाल, श्रीफळ आणि काँग्रेस चा दुपट्टा देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत केले. सोबतच संजय दिगदिकुलवार यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केले. त्यांचेही स्वागत करण्यात आले. गौतम रत्ने हे अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीशी जुळलेले आणि बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे बळ वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष रंजन लांडे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, भुरकुंडा येथील नथुजी कोंडावार, सुरेश ठाकरे, विकास पिंपळकर, संगीता टेकाम, कृष्णा आत्राम, प्रतिमा कुळसंगे, कविता आत्राम, अक्षय कोंडावार, विनायक कांबळे, प्रफुल आत्राम यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *