लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 28 सप्टेंबर ला शिक्षक पालक संघाची सभा संपन्न झाली,या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या .सौ.स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे , उपप्राचार्य श्री. विजय आकनूरवार , पर्यावेक्षक श्री. एच बी मस्की , तसेच विध्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. कृष्णा बत्तुलवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
सदर सभेत शिक्षक पालक संघ व माता पालक संघाची नवं नियुक्त कार्य कारणी गठीत करण्यात आली शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून श्री योगेश बांदुरकर याची निवड झाली तर सचिव म्हणून विद्यालयाचे शिक्षक श्री. हरिहर होमराज खरवडे , सहसचिव म्हणून प्रा विवेक पाल, पालक सचिव म्हणून श्री उमेश पालिवार, याची निवड करण्यात आली तर महिला सदस्य म्हणून सौ मनीषा पातूरकर, सविता जेणेकर, शिला बुरडकर,वर्षा गुरमे याची निवड झाली तर पुरुष सदस्य म्हणून श्री केशव वाघमारे, श्री विजय सोनवणे, श्री मिलिंद आस्वले, श्री बाळूजी बोधले तर शिक्षक प्रतिनिधी मधुन रविंद्र चौधरी , कु.श्वेतलाना टिपले ,श्री मनोहर तोडसे ,कु. शीतल बोधे यांची सर्वनुमते निवड करण्यात आली.
माता पालक संघाच्या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून श्रीमती.भारती घोंगे , उपाध्यक्ष म्हणून पायल येलमुले, सचिव म्हणून श्रीमती वैशाली हेपट , सहसचिव म्हणून सौ मंजुळा सातपुते, याची निवड झाली तर सदस्य म्हणून सौ रुपाली डीवरे, सौ बबिता वाघमारे याची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेत पालकांनी समस्या मांडल्या,सर्व विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली व अध्यक्षीय भाषणातुन मुख्यध्यापिका प्रा. सौ स्मिताताई चिताडे यांनी सभेला मोलाचे मार्गदर्शन केले व पालकाच्या समस्या चे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
सदर सभेचे संचालन श्री संतोष मुंगुले यांनी केले तर सभेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवराचे आभार श्री. वामन टेकाम यांनी मानले. सदर सभेला बहुसंख्येने महिला व पुरुष पालक वर्ग ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,