लोकदर्शन👉 मोहन भारती
जिवती :– जिवती तालुक्यातील पाटण / चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात वीज पडून चिखली येथील शेतकरी वंदना चंदू कोटनाके (३५), भारुला अनिल कोरांगे (३२) या २ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर मारईपाटण येथील शेतकरी चंद्रहास यादव टोपे यांचा देखील विज पडून जखमी झाल्याने रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
आमदार सुभाष धोटे यांनी या अत्यंत दुःखद घटनेची माहिती मिळताच सर्व मृतकांच्या परिवारास भेट देऊन संत्वान केले तसेच नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत मृत कुटुंबास चार लाख सानुग्रह निधीची मदत लवकरात लवकर मिळावी यासंदर्भाने तातडीने कारवाई करावी असे निर्देश जिवतीचे तहसीलदार व संबंधित विभागाला संपर्क साधून दिलेत. या घटनेत जखमींची संख्या ४ आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. या सर्वांच्या तब्येतीची चौकशीही आमदार धोटे यांनी केली.
या प्रसंगी मृतकांचे परिवारातील सदस्य, आदिवासी एकामिक विभाग चंद्रपूर चे माजी अध्यक्ष भिमराव पा मडावी, अंकुश पा. गेडाम, देवराव पा.गेडाम, माजी उप सरपंच भिमराव पवार, माजी सरपंच सिताराम मडावी, गोपाळ कासले, आनंदराव जाधव, भिका पा आडे, भिमराव मेश्राम, पोलिस पाटील, सुधाकर जाधव, जंगु मडावी, तिरुपती पोले, शेख अब्बास अली साहब, जंगु पा.मेश्राम, इसतराव भिमराव गेडाम, राजु कोवे, माणकु मेश्राम यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.