लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून व आवाहनानुसार संपूर्ण देशभर स्वच्छता अभियानास गती मिळाली व आज प्रत्येक नागरीक स्वच्छता अभियानाचा धागा हावून हे कार्य पार पाडत आहे. हे कार्य निरंतर सुरु रहावे व त्याला लोकचळवळीचे स्वरुप लाभावे हा या अभियानामागील उद्देश असल्याने भाजपाने मोदीजींच्या जन्मदिवसापासून ते गांधी जयंती पर्यंत विविध सामाजिक कार्याचा समावेश करुन हा ’सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचे नियोजन केले असून आजचा हा स्वच्छता उपक्रम या पंधरवाड्याचा भाग असून सर्वांनी या कार्यात योगदान दिल्याबद्दल कृतज्ञ असल्याचे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
भाजपा, भाजपा ओबाीसी मोर्चा द्वारा दि 28 सप्टेंबर रोजी अंचलेश्वर मंदिर परीसरातील झरपट घाटावर भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अहीर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात स्वच्छता मोहिम राबविली. या मोहिमेत योग नृत्य परीवार, हिंदु राष्ट्रम् ग्रुप व स्वराज फाऊॅंडेशन च्या पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. यावेळी हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते स्वच्छतेच्या कार्यांत मौलिक योगदान देणाऱ्या सफाई कामगार बांधवांचा पुष्पहार घालून सत्कार केला. याप्रसंगी योग नृत्य परीवाराचे गोपाल मुंधडा यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करुन पदाधिकाऱ्यांसह सन्मान केला.
या कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ मंगेश गुलवाडे, महामंत्री रवि गुरनुले, राजू घरोटे, ओबीसी मोर्चाचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, ओबीसी मोर्चाच्या महानगर जिल्हा संयोजिका वंदना संतोषवार, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार, रवि लोणकर, संदीप आगलावे, रवि चहारे, शशीकांत म्हस्के, राजेंद्र खांडेकर, प्रदिप किरमे, शाम कनकम, मनोहर राऊत, देवानंद साखरकर, राजेश वाकोडे, माया उईके, स्वप्नील मुन, अरुणा चैधरी, पराग मलोडे, रुपाली आंबटकर, शालीनी वासमवार, गीता महाकुलकर, सुभाष आदमने, शाम बोबडे, गोपाळा जोशी, शिवाजी वाकोडे, सुदामा यादव, गौतम यादव, पूनम तिवारी, नंदू लभाने प्रियंका पुनवटकर, प्रणाली रागीट, सुरेश घोडके, मुग्धा खांडे, मयुरी हेडाऊ, रवि निखारे, रंजू मोडक यांचेसह भाजप कार्यकर्ते व परीसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.