*लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे*
उरण दि 27 सप्टेंबर चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड तर्फे श्री गणेश आरास स्पर्धा 2022 चे वितरण समारंभ सोहळा बाल संस्कार केंद्र, चारफाटा उरण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच संस्थेचे मुख्य सचिव कु. आभिषेक माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाल संस्कार केंद्र, चारफाटा,उरण येथे अन्नदान करण्यात आले. व उरण तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां मान्यवरांना व संस्थांना उरण विशेष सम्मान 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली बाल संस्कार केंद्र उरण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश आरास स्पर्धा 2022 या स्पर्धेत प्रथम क्रमांक -उमेश पांचाळ (करंजा ), द्वितीय क्रमांक -अभिजित कणेकर (दादर पाडा ), तृतीय क्रमांक -हर्षल म्हात्रे (पागोटे ), उतेजनार्थ ऋषिकेश भेंडे (कळंबुसरे ), आविनाश पाटील (कुंडेगाव ), हितेश भोईर (जसखार ), विनोद घरत (डोगरी ), अनिस कसूकर (दादरपाडा )यांनी विजय प्राप्त करून बक्षीसे मिळविली.या मान्यवरांना ट्राफी, सन्मानपत्र तुळशी रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उरण मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना उरण विशेष सन्मान 2022 हा पुरस्कार देण्यात आले.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण (सामाजिक श्रेत्र ),डॉ सत्यनारायण ठाकरे (आरोग्य सेवा ), सुनील होळकर (शिक्षण श्रेत्र ), अमृत म्हात्रे (लोक नुत्य ), आतिष पाटील (निवेदक), सत्यजित कडू (चित्रकार )या पुरस्कारकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, संस्थेचे प्रमाण पत्र व शाल, तुळशी रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी नरेश म्हात्रे (रायगड भूषण )राऊ म्हात्रे (बालसंस्कार केंद्र- सचिव ), चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू,कुणाल पाटील (अध्यक्ष ), विक्रांत कडू (कार्यध्यक्ष ),कु. ह्रितिक पाटील (कार्याध्यक्ष ), मनोज ठाकूर (उपाध्यक्ष ),आभिषेक माळी (सचिव ),धीरज घरत, उद्धव कोळी, निवृत्ती ठाकूर, भूषण कडू, आदित्य पारवे, मनमितेश कोळी, विवेक कडू,विनय पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगडचे कौतुक केले तसेच विकास कडू यांच्या मार्गदर्शना खालीही संस्था पुढे खूप मोठी भरारी घेईल असे सुनील वर्तक यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर चाईल्ड केअर सामाजिक संस्था आणी विकास कडू सर यांचे कार्य मी जवळ जवळ 6/7वर्ष बघत आलो त्यांचे कार्य खूप समाज उपयोगी आहे असे संजय होळकर यांनी आपले मत व्यक्त केले. विकास कडू हे अनेक गरज वंताना, आदिवासी वाडीत मदतीचे हात देतात हे सर्वाना उरण तालुक्यात माहिती आहे पण आता हे ही जनतेला माहित होईल कि समाज उपयोगी कार्य करणाऱ्यांना व कला, क्रीडा, शैक्षणिक,सामाजिक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानही करतात असे आतिष पाटील म्हणाले.कार्यक्रमाचे मनोगत रा.ऊ.म्हात्रे यांनी केले.तर सूत्र संचालन विकास कडू यांनी आणि आभार प्रदर्शन धीरज घरत यांनी केले.