*लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे*
उरण दि 25 केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई श्रम कार्ड आवश्यक आहे.वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना जास्तीत जास्त विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उरण तालुक्याच्या माध्यमातून रविवार दिनांक 25/9/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उरण तालुक्यातील पूर्व विभागात असलेल्या साईकृपा इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि कोप्रोली नाका, कोप्रोली येथे ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराला जनतेचा, वाहतूकदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या ड्रायवर यांना ई श्रम कार्ड मोफत काढून देण्यात आले.नागरिकांनी या फ्री ई श्रम कार्ड शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. भाजपा ट्रान्सपोर्ट सेल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक गरजूना मदत झाल्याने सर्वांनी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे आभार मानले आहेत.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे उरण तालुकाध्यक्ष सुदेश पाटिल, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटिल, गाव अध्यक्ष अभय पाटिल,साईकृपा इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि कोप्रोलीचे मालक राकेश पाटिल, ई श्रम कार्ड काढून देणारे ऑपरेटर विकी कोळी तसेच भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष विकी पाटिल,श्री बापूचे देव टॅक्सी चालक-मालक संघटना कोप्रोलीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे,श्री बापूजी देव रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष गिरीश म्हात्रे,कल्पेश म्हात्रे, निलेश पाटील, दत्तराज म्हात्रे, नंदन म्हात्रे, पर्जन्य म्हात्रे, प्रितम म्हात्रे, योगेश गावंड, विकीभाई म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.