लोकदर्शन👉 मोहन भारती
कोरपना :
कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु येथे जिल्ह्यातील दारूबंदीपासून अवैध व बनावाट दारूविक्री सुरु असून ती तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीला घेऊन युथ इमर्जन्सी सर्व्हिस चे अध्य्क्ष अमोल कळस्कर यांच्या नेतृत्वाखाली अंतरगाव बु येथील महिलांनी पोलीस स्टेशन ला धडक देऊन अवैध दारू बंदीचे निवेदन दिले. अवैध व बनावट दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग झाल्याचे चित्र गावात मिर्माण झाले आहे. गावातील काही व्यक्ती गावात अवैध दारू विकत असून सुखाणे नांदणारे संसार आज घडीला उघड्यावर आले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे गावातच दारू मिळत असल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे.दारूबंदीसाठी ग्राम पंचायत मार्फत अनेक ठरावं निवेदन पोलीस स्टेशन तहसीलदार पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात आले पण त्यांच्या विवेदणाचा काही विशेष परिणाम झाला नाही.गावातील दारूविक्रेते भर चौकात व घरीच अवैध दारू भट्टी चालवत असल्याने दारू विक्रीचा कामालिचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.दारू विक्रीला कंटाळून युथ इमर्जन्सी सर्व्हिस महिला बचत गट तंटामुक्ती समिती गावातील नागरिक एकत्र येत कोरपणा पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. कोरपणा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सदाशिव ढाकणे कार्यालयात उपस्थित नसल्याने मेजर गेडाम यांना निवेदन देण्यात आले.मोर्च्यामध्ये युथ इमर्जन्सी सर्व्हिस अंतरगाव बु चे अध्यक्ष अमोल कळस्कर शांताबाई पेटकर शारदा सूर वंदना राजूरकर संगीता धोटे जनाबाई उपाध्ये रसिका खोब्रागडे जोत्स्ना आदे सीमा गुरनुले नांदा मोरे गंगुबाई टेकाम आनंदराव मडावी पोलीस पाटील अंतरगाव, तं. मु अ. विनोद सूर,ईश्वर खेलुरकर प्रमोद पिंपळशेंडे अंकित वडस्कर आदी उपस्थित होते.