लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :– जिवती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. सर्वप्रथम सकाळी १० : ३० वाजता समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिवती येथील पंचशील ध्वज ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे ठिकाणापर्यंत मोटारसायकल रॅली, प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर दुपारी २:३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे होते तर प्रमुख अतिथी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे, कलाम साहेब, के. मूर्ती, डॉ. मिलिंद शिखारे, नरसिंग मोरे, नगराध्यक्ष कविता आडे, अमर राठोड, संजय कथाडे, राजू येले, गणपत आडे, महेश देवकते, विनोद दत्तात्रेय, आनंद भालेराव, प्रकाश कांबळे, नगरसेविका सतलुबाई जुमनाके, पुष्पाताई नैताम, अनिता गोतावळे, जी एस कांबळे, उद्धव कांबळे, डॉ. अंकुश गोतावळे उपनगराध्यक्ष, देविदास कांबळे, दत्ता तोगरे, गणेश वाघमारे, दत्ता गायकवाड, केशव भालेराव, आनंद पवार, निवृत्ती कासराळे, मारुती मोरे, प्रल्हाद मदने, भानुदास जाधव, पंढरी गायकवाड, भगवान डुकरे, डॉ. पांडुरंग भालेराव, रमाकांत गंगापल्ले, विजय गोतावळे, व्यंकटी तोगरे, दत्ता डोरे, प्राचार्य लिंबोरे, पंडित पवार, वैजनाथ सुर्यवंशी, संजय चौगुले भोजु काका गायकवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की, गोरगरीब, कष्टकरी, कामगारांच्या वेदना, दुःख जगासमोर मांडून त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करणारे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच गोवामुक्ती संग्रामातील लढवय्ये सेनानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थाने जगातील प्रत्येक मानवासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या प्रेरणेने समाजबांधवांनी प्रगतीसाठी संघर्ष करावा. तर आमदार सुभाष धोटे म्हणाले की, जिवती सारख्या अतिदुर्गम भागात अनेक संकटावर मात करीत अतिशय कष्टाने नागरिकांनी आपले संसार उभे केले आहेत. संघर्षशील, कष्टकरी जनतेचा आवाज असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्नाकृती पुतळ्याच्या अनावरणाने आणि त्यांच्या विचार व प्रेरणेने येथील नागरिकांना, नव्या पिढीला अधिक बळ व ऊर्जा मिळेल याची खात्री आहे.
मार्गदर्शनाच्या कार्यक्रमानंतर स्टार प्रवाह चॅनल वरील मी होणार सुपरस्टार फेम मधील कुमारी प्रांजल बोधक हिचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन दिपक गोतावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जी.ऐस कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातंग समाज समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिवती व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.