लोकदर्शन प्रतिनीधी 👉अशोक शिंदे
धाराशिव जिल्ह्यातील कंळब शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती महामोर्चा संपन्न झाल्यानंतर आता त्याचे हळु-हळु लोण पसरु लागले आहेत.आता दुसर्या टप्प्यातील धाराशिव लगतच आसणार्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे दि.०३ आक्टोबंर सोमवार रोजी मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन केले आसुन मराठा समाजास कुणबी मराठा म्हणुन ५० टक्के ओबीसी प्रवर्गातुन आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त मराठा समाज आसुन काही बोटावर मोजन्याईतकेच लोक हे श्रीमंत आहेत.त्यांना आरक्षणाची गरज नसली तरी बंहुताश मराठा समाज हा आरक्षणासाठी झगडत आहे.त्यांचे तर आयुष्य या आरक्षणापायी गेलेच आहे निदान येणार्या नविन पिढीला तरी आरक्षण मिळावे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन मोर्चे होताना दिसत आहेत.आता बराच कालावधी लोटल्यानतंर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज पेटुन उठताना दिसत आहे.धाराशिव जिल्ह्यातील कंळब शहरामध्येही लांखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.आता त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील सर्वात मागासलेला व उसतोड कामगारांचा तालुका म्हणुन ओळख आसलेल्या शिरुर कासार येथे मराठा क्रांती महामोर्याचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात ५८ मोर्चे काढल्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे.शिरुर शहरातील सिद्धेश्वर मंदीरावर मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ०३ आक्टोबंंर हि तारीख निश्चित करण्यात आली आहे.तश्या आशयाचे निवेदनही तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे व नगर पंतायत शिरुर यांना देण्यात आले आहे.हा मोर्चा छञपती संभाजी महाराज चौक येथुन आरंभ होईल ते तहसिल कार्यालय येथे समाप्त होईल.सकल मराठा समाज शिरुर कासार तालुक्याच्या वतीने या मराठा क्रांती महामोर्चात लांखोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आणी हा मोर्चा न भुतो न भविष्य असा होण्यासाठी मराठा बांधव गेल्या काही दिवसापासुन जिवाचे रान करणतांना दिसत आहेत.
चौकट-१
….आणी यावच लागतय.
शिरुर कासार येथे होणार्या मराठा क्रांती महामोर्चा दि.०३ वार सोमवार रोजी होणार आहे.तश्या आशयाच्या सध्या पोस्ट सोशल मिडीयावर भरपुर व्हायरल होताना दिसत आहेत.पण त्यातील एक पोस्ट म्हणंजे आरक्षणासाठी यावच लागत मराठा महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.व एकच मिशन ५० टक्के ओबीसीमधुन कुणबी मराठा म्हणून आरक्षण अश्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.
चौकट_२
या महामोर्चाला राज्यभरातुन मराठा समाज येणार _
शिरुर कासार येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विराट महामोर्चा होणार आसुन राज्यभरातुन मराठा समाज येणार आहे.तशी व्यवस्थाही केलेली आहे.त्या दृष्टीने महामोर्चा संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीचे आयोजन होत आहे.या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे