लोकदर्शन👉 राहुल खरात
२०१६ सालीआमच्या घराचे बांधकाम चालु होते.५ते ६बांधकाम मजूर काम करण्यासाठी येत. श्री शंकर राठोड यांनी मला त्यांच्या मुली बद्दल सांगितले.राहणारे कर्नाटक चे कामाच्या निमित्ताने पुण्याला आले.मुलगी नेहा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.गावी असताना शाळेत जात होती.शाळेत उचलुन न्यावे लागे .पुण्यात आल्या वर शिक्षण बंद झाले.कारण आई वडील दोघेही मजुर कामाला जात
मुलीला शिकवायचे आहे. त्या विषयी बोलले.नेहा ला ही पुढे शिकायचं आहे. दिव्यांग संस्थेची चौकशी करून, त्यांना सविस्तर सांगितले वसतिगृहात राहण्याची तिची तयारी होती.
” सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान”
कल्याणकारी संस्था वानवडी पुणे या संस्थेत प्रवेश मिळवुन दिला तिथे नेहा चे ७वी ते १० वी पर्यंत शिक्षण झाले .१० वी ला ६३ टक्के मिळुन पास झाली. तिथुन ती शिरूर च्या संस्थेत पुढील शिक्षणासाठी गेली. १२ वी ला ६० % नी पास झाली.
पास झाल्यावर संस्थेत भेटण्यास आली .सोबत आई वडील ही होते.तिघे ही खुप आनंदात होते.प्रथम भेटलेली नेहा व आताची नेहा मध्ये खुप फरक दिसुन आला.मी पुढचे शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहणार आहे.मी हे करू शकते असा आत्मविश्वास तिच्या मध्ये निर्माण झाला आहे.हे तिच्या चेहऱ्यावर दिसून आले. तिच्या पालकांची हीच इच्छा आहे.
नेहा व तिच्या आई वडिलांनी स्वता :शेअर केले आहे
सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान
संस्थापिका
उज्वला गायकवाड उन
७०३८३५२१८४